-
‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित कार्यक्रमामधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे सुम्बुल तौकिर खान.
-
सुम्बुलने अगदी लहान वयातच कलाक्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
हिंदी मालिका चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत सुम्बुलने प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
‘बिग बॉस १६’मध्येही ती अगदी खेळाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत टिकून राहिली.
-
आता सुम्बुलने तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.
-
वयाच्या १९व्या वर्षीच तिने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केलं आहे.
-
सुम्बुलने तिच्या घराचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
तिने तिच्या नव्या घरामध्ये एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
‘बिग बॉस १६’मधील तिच्या काही जवळच्या मित्र मंडळींनीही या पार्टीला हजेरी लावली होती.
-
शिव ठाकरे, निमृत कौर, मयुरी देशमुख यांसारख्या कलाकार मंडळींनी सुम्बुलच्या हाऊस पार्टीला उपस्थिती दर्शवली.
-
यावेळी सुम्बुलच्या घरातील मंडळीही उपस्थित होती.
-
सुम्बुलचे वडील व तिची बहिणही अगदी खूश दिसत होते.
-
सुम्बुलने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल