-
प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंट सातत्याने चर्चेत आहे.
-
राधिका मर्चंटने नुकतंच फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीला हजेरी लावली.
-
‘मेरा नूर है मशहूर’ या फॅशन चित्रपटाच्या प्रिमिअर निमित्ताने ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
-
या पार्टीदरम्यान राधिका मर्चंटच्या हातात असलेल्या बॅगने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
राधिका मर्चंटने या कार्यक्रमावेळी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.
-
त्याबरोबर तिने डिझाईनर ब्लाऊज परिधान केला होता.
-
राधिकाने यावेळी गळ्या डायमंडचा नेकलेस घातला असून त्या लूकला साजेसा मेकअप केला होता.
-
या पार्टीत राधिकाच्या लूकबरोबरच तिच्या हातातील छोट्याशा बॅगनेही लक्ष वेधून घेतले. या बॅगची किंमत पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
-
राधिकाने या पार्टीदरम्यान फिकट गुलाबी रंगाची एक मिनी बॅग हातात घेतली होती.
-
ही बॅग हर्मीस (Hermes) या ब्रँडची आहे.
-
ही बॅग मगरीच्या चामड्यापासून बनवण्यात आली आहे.
-
हर्मीस या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, राधिकाच्या हातातील या छोट्याशा बॅगेची किंमत ५८ हजार ६०० डॉलर आहे.
-
भारतीय चलनानुसार या बॅगेची किंमत जवळपास ४८ लाख रुपये इतकी आहे.
-
राधिकाच्या या बॅगेची किंमत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
दरम्यान राधिका मर्चंट लवकरच अनंत अंबानीबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”