-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने नवाजुद्दीनवर अनेक आरोप केले आहेत.
-
आलियाने नवाजुद्दीनचे अफेअर असल्याचाही दावा केला होता.
-
नवाजुद्दीनने मुलांसह घराबाहेर काढल्याचाही आरोप आलिया सिद्दीकीने केला होता. पण वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत राहण्याची ही त्याची पहिली वेळ नाही.
-
चरित्रात्मक पुस्तकामुळे नवाजुद्दीनचे प्रोफेशनल आयुष्यासोबतच खासगी आयुष्य चांगलेच चर्चेत होते.
-
‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ या पुस्तकात नवाजुद्दीनने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते.
-
मात्र त्यावरून निर्माण झालेल्या वादांमुळे त्याला हे पुस्तक मागे घ्यावं लागलं होतं.
-
अभिनेत्री निहारिका सिंहशी असलेल्या अफेअरचा खुलासा नवाजुद्दीनने या पुस्तकात केला होता.
-
नवाजुद्दीनने ‘मिस लव्हली’ या चित्रपटात अभिनेत्री निहारिका सिंह हिच्यासोबत काम केले होते.
-
२०१२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीनचे शारीरिक संबंध होते, असं या पुस्तकात लिहिलं होतं.
-
जवळपास एक वर्ष निहारिकासोबत अफेअर असल्याचं त्याने त्यात स्पष्ट केलं होतं.
-
निहारिकाने याविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
-
नवाजुद्दीन त्याचे पुस्तक विकण्यासाठी, त्याचा खप वाढवण्यासाठी एका महिलेचं शोषण करत आहे, तिचा अपमान करत आहे, असं मत मांडत अभिनेत्री निहारिका सिंहने त्याच्यावर टीकासुद्धा केली होती.
-
न्यूयॉर्कमधील वेटरसोबत वन नाइट स्टँड – नवाजुद्दीन न्यूयॉर्कमध्ये एका कॅफेमध्ये बसला होता. या कॅफेमध्ये एक महिला वेटर नवाजुद्दीनकडे सतत बघत होती. बऱ्याच वेळानंतर त्या महिलेनं नवाजुद्दीनला विचारलं की, तुम्ही अभिनेते आहात का? त्यावर नवाजुद्दीनने हो असं उत्तर दिलं. नवाजुद्दीनचा ‘द लंचबॉक्स’ हा चित्रपट पाहिल्याचं त्या महिलेनं सांगितलं. त्या वेटरसोबत वन नाइट स्टँड राहिल्याचा खुलासा नवाजुद्दीनने केला होता.
-
अभिनेत्री सुनीता राजवारशी रिलेशनशिप- सुनीता पूर्वाश्रमीची प्रेयसी असल्याचं नवाजने पुस्तकात म्हटलं होतं.
-
मुंबईत आल्यानंतर कशाप्रकारे तो सुनीताच्या प्रेमात पडला आणि एके दिवशी तिने त्याची साथ सोडली, हे सर्व त्यात मांडलं होतं. नंतर सुनिताने यावर आक्षेप घेत नवाजला कायदेशीर नोटीस बजावली होती.
-
गर्लफ्रेंड सुनीताशी ब्रेकअप झाल्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता, असा खुलासा नवाजुद्दीनने त्याच्या पुस्तकात केला होता. त्यावेळी नवाजुद्दीन मीरा रोड येथे राहत होता. ब्रेकअपसाठी सुनीताचा जेव्हा फोन आला तेव्हा नवाजुद्दीन रेल्वे स्टेशनवर उभा होता. त्याचवेळी आत्महत्या करण्याचा विचार मनात डोकावला असे त्याने म्हटले होते.
-
मात्र यापुढे पुन्हा कधी सिरिअस रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही असा विचार करत नवाजुद्दीन घरी परतला होता.
-
नवाजुद्दीनच्या या पुस्तकावर अनेकांनी आक्षेप घेतले होते आणि या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. सध्या तो त्याच्या पत्नीबरोबरच्या भांडणामुळे चर्चेत आहे. (सर्व फोटो- इंडियन एक्सप्रेस व लोकसत्ता)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख