-
वयाची सत्तरी ओलांडली तरी बिग बी अमिताभ बच्चन आजही तितक्याच जोमाने कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत.
-
बिग बी सध्या त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.
-
या चित्रपटात बच्चन यांच्याबरोबर प्रभास आणि दीपिका पदूकोण हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
हैदराबादमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली असल्याची बातमी समोर आली आहे.
-
अॅक्शन सीन चित्रीत करत असताना बच्चन यांना दुखापत झाली असून त्यांच्या बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. यामुळे चित्रीकरणही रद्द करण्यात आलं आहे.
-
१९८३ सालीसुद्धा ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ यांना गंभीत दुखापत झाली होती.
-
पुनीत इस्सर या कलाकाराबरोबर मारामारीच्या एका दृष्याच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती.
-
यावेळी त्यांच्या जवळवजळ २०० चाहत्यांनी रक्तदानाच्या माध्यमातून ६० बाटल्या रक्त जमा केलं होतं.
-
त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत होता. हा अपघात खूपच गंभीर होता.
-
मुंबईमध्ये अमिताभ यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनीसुद्धा हार मानली होती, डॉक्टरांनी बच्चन यांना ‘वैद्यकीयदृष्ट्या मृत’ असंदेखील घोषित केलं होतं. उपचारादरम्यान अमिताभ यांना औषधांचे स्ट्रॉंग डोस देण्यात आले होते. ज्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि ते ‘कुली’चं चित्रीकरण पूर्ण करू शकले.
-
‘प्रोजेक्ट के’च्या सेटवर झालेल्या अपघातामुळे सध्या बच्चन यांचे चाहते चिंतित आहेत.
-
आता बिग बी यांची तब्येत ठीक असून, सध्या चित्रीकरण थांबवून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण देश त्यांच्या उत्तम तब्येतीसाठी प्रार्थना करताना आपल्याला दिसत आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…