-
यंदाची होळी बॉलिवूड सेलिब्रिटीजनी अगदी धूम धडाक्यात साजरी केली, पण ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवरील वेगवेगळ्या वेबसीरिजमधील तुमच्या आवडत्या पात्रांनी होळी नेमकी कशी साजरी केली असती याचे काही मजेशीर फोटो प्राइम व्हिडिओने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘मिर्जापुर’ या वेबसीरिजमधील आपलं सगळ्यांचं लाडकं पात्र मुन्ना भैय्याला होळीच्या दिवशी या अवतारात पाहायला सगळ्यांनाच आवडेल.
-
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘केजीएफ चॅप्टर २’मधील रॉकी भाई त्याच्या खास अंदाजात होळी साजरी करताना.
-
नुकत्याच लोकप्रिय झालेल्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमधील गोड जोडपं त्यांच्या हटके अंदाजात रंग लावून सेल्फी काढताना.
-
प्राइम व्हिडिओच्या सर्वात गाजलेल्या ‘मेड इन हेवन’मधील तारा धूलिवंदनाची मजा लुटताना.
-
आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ‘पंचायत’ वेबसीरिजमधील सचिवजी आणि त्यांचे मित्रदेखील होळीच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
-
‘हॉस्टेल डेज’ या जबरदस्त वेबसीरिजमधील या पात्राला कसं विसरता येईल?
-
गांधीगिरी करणारा आपल्या सगळ्यांचा लाडका मुन्नाभाई होळी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
-
रील्सच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या ‘द बॉइज’ या वेबसीरिजमधील हे लोकप्रिय पात्र होळी खेळताना काहीसं असंच दिसेल. (फोटो सौजन्य : ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ / इन्स्टाग्राम)

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल