-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे.
-
हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-
सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला.
-
सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.
-
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं.
-
‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
-
‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या.
-
सतीश कौशिक यांनी १९८५ साली शशी कौशिक यांच्याशी विवाह केला होता.
-
१९९६ मध्ये कौशिक यांनी दोन वर्षाचा मुलगा गमावला होता. मुलाच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
-
त्यानंतर ५६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने ते पुन्हा वडील झाले. मुलीच्या जन्माने ते आनंदी होते.
-
वंशिका असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. त्यांच्यामागे पत्नी व १० वर्षांची मुलगी वंशिका असा परिवार आहे.
-
सतीश कौशिक आयुष्यभराच्या कमाईतून ४० कोटींची कमाई पत्नी व मुलीसाठी सोडून गेले आहेत.
-
(सर्व फोटो: सतीश कौशिक/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”