-
छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका आजही लोकप्रिय आहे.
-
या मालिकेतून अंगूरी भाभीजी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रे ही घराघरात प्रसिद्ध आहे.
-
या मालिकेत एका सालस, निरागस आणि भोळ्या भाबड्या पत्नीची भूमिका साकारत तिने प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलं आहे.
-
सध्या शुभांगी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
-
शुभांगीने नुकतंच तिचा पती पियुष पुरेपासून घटस्फोट घेतला आहे.
-
शुभांगीच्या घटस्फोटाचं वृत्त ऐकताच चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
-
तिने स्वत: तिच्या घटस्फोटाबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी तिने घटस्फोट का घेतला त्याची कारणही सांगितली आहेत.
-
नुकंतच शुभांगीने ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत शुभांगी म्हणाली, “गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं एकत्र राहत नाही.”
-
“पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.”
-
“कोणतंही लग्नाचं नातं हे सन्मान, विश्वास आणि मैत्रीवर टिकून असतं.”
-
“पण आमच्यात सतत मतभेद होत होते. आमच्यातील मतभेदांमधून कोणताच मार्ग निघत नव्हता.”
-
“यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना अंतर दिले.”
-
“त्यानंतर आम्ही वैयक्तिक आयुष्याकडे आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.”
-
“हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. मी कुटुंबाला पहिलं प्राधान्य देते.”
-
“आपल्या कुटुंबातील सदस्य आजूबाजूला असावेत असं प्रत्येकालाच वाटतं.”
-
“खूप वर्षांचं नातं जेव्हा तुटतं तेव्हा मानसिक व भावनिक त्रास होतो.”
-
“पण आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि मीही या निर्णयाशी सहमत आहे.”
-
शुभांगी व पियुष यांचा विवाहसोहळा २००३मध्ये इंदौर येथे पार पडला.
-
लग्नाच्या १९ वर्षांनंतर दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.
-
शुभांगीला १८ वर्षांची मुलगी आहे.

VIDEO: “मी गेली ३ वर्षे…”, शुबमन गिलचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा; सारा तेंडुलकरसह ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान काय म्हणाला?