-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर, तिच्या लूकमुळे कायम चर्चेत येत असते.
-
नुकताच श्रद्धा कपूरचा ‘तू झुटी मै मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूरबरोबर पहिल्यांदा झळकली आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ती अनेक ठिकाणी गेली होती. तेव्हा तिने एका मुलाखतीदरम्यान तिने शाळेत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले आहे.
-
ती असं म्हणाली आपण सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या परीक्षेत कॉपी केली आहे. मी माझ्या ड्रेसमध्ये उत्तर लिहून ठेवली होती.
-
मला वाटले की किती छान कल्पना कोणीही मला पकडू शकणार नाही. मात्र मी उत्तर बघत असताना शिक्षक माझ्या बाजूला उभे होते.
-
माझे शिक्षक जोरात ओरडले ‘श्रद्धा’ आणि शेवटी मी पकडले गेले. खरं सांगायचं तर सर्वात मी खोटारडी आहे. हा किस्सा तिने सांगितला होता.
-
श्रद्धा कपूरला मराठी संस्कृतीबद्दल, मराठी भाषेबद्दल नेहमीच गोडी वाटत आली आहे. बोलणं असो, वेशभूषा असो अथवा खाद्यपदार्थ अनेकदा ती तिच्या कृतीतून तिला मराठी संस्कृतीबद्दल वाटणारं प्रेम दाखवत असते.
-
श्रद्धाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. ‘आशिकी २’ चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळाली.
-
दरम्यान श्रद्धा रणबीरच्या या चित्रपटाने १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…