-
कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर या पुरस्काराला ओळखला जाते.
-
अँड द ऑस्कर गोज टू…हे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले आहेत.
-
ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी सोनेरी रंगाची असते.
-
त्यामुळे तिला सोनेरी बाहुली असेही ओळखले जाते.
-
ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो.
-
मात्र ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी खरच सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
-
ऑस्करच्या त्या ट्रॉफीची किंमत नेमकी किती असते? त्याचा फायदा काय होतो? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
-
ऑस्कर पुरस्कारावर दरवर्षी अब्जावधी रुपये खर्च केले जातात.
-
या ट्रॉफीची किंमत त्यावेळीच्या तांबे आणि सोन्याच्या किंमतीवर अवलंबून असते.
-
दरवर्षी या एका ट्रॉफीची निर्मिती करण्यासाठी ४०० डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास ३१ हजार रुपये खर्च येतो.
-
एका रिपोर्टनुसार, ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या विजेत्या कलाकारांचे मानधन तीन ते चार पटीने वाढते.
-
त्यांच्या मानधनात जवळपास ८१ टक्क्यांनी वाढ होते.
-
ऑस्कर पुरस्कारात मिळणारी ती ट्रॉफी तांब्याची असते.
-
त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावलेला असतो.
-
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, धातूच्या कमतरतेमुळे सलग तीन वर्ष ऑस्कर ट्रॉफी रंग लावलेल्या प्लॅस्टरमध्ये तयार करण्यात आली.
-
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नियमानुसार, कोणत्याही विजेत्याचा ऑस्कर ट्रॉफीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो.
-
त्यामुळे विजेत्याची इच्छा असली तरी तो ही ऑस्कर ट्रॉफी विकू शकत नाही.
-
जर विजेत्याला ती ट्रॉफी विकायची असेल तर त्याला सर्वात आधी ती अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सला विकावी लागते.
-
विशेष म्हणजे ही अकादमी फक्त १ डॉलरला ऑस्कर ट्रॉफी विकत घेते.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा