-
भारताला यंदाच्या ऑस्करमध्ये दोन पुरस्कार मिळाले.
-
‘नाटू नाटू’ व ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ यासाठी भारताने ऑस्कर जिंकले.
-
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
-
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे.
-
या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा आहेत.
-
गुनीत मोंगा साडी नेसून मंचावर ऑस्कर पुरस्कार घेण्यासाठी गेल्याने त्यांची चांगलीच चर्चा होत आहे.
-
त्यांच्याबरोबर दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस देखील होत्या.
-
गुनीत मोंगा या चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक आहेत.
-
त्यांनी आतापर्यंत ‘पगलैट’, ‘द लंचबॉक्स’ आणि ऑस्कर विजेता शॉर्ट डॉक्यूमेंटरी ‘पीरियड अँड ऑफ सेंटेंस’ची निर्मिती केली आहे.
-
३९ वर्षांच्या गुनीत मोंगा या सिख्या एंटरटेनमेंटच्या संस्थापक व सीईओ आहेत.
-
गुनीत यांनी डिसेंबर २०२२ मध्ये सनी कपूरशी लग्न केलं.
-
दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती.
-
‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मसान’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती गुनीत यांच्या कंपनीने केली आहे.
-
“आम्ही आत्ताच भारतीय प्रॉडक्शनसाठी पहिला ऑस्कर जिंकला! दोन महिलांनी हे करून दाखवलंय! मी अजूनही थरथरत आहे,” असं गुनीत मोंगा यांनी ऑस्कर जिंकल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
-
(सर्व फोटो – गुनीत यांचे इन्स्टाग्राम व संग्रहित)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख