-
अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं.
-
स्वराने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला.
-
स्वरा व फहादने गुपचूप साखरपुडाही उरकला.
-
आता गेल्या तीन दिवसांपासून स्वराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.
-
दिल्ली येथी स्वराच्या आजी-आजोबांच्या घरी या विधी सुरू आहेत.
-
तिने हळदीचे व संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते.
-
आता स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये फहाद तिला किस करताना दिसत आहे. पण या दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं नसल्याचं समोर आलं आहे.
-
फहादने हिंदू किंवा मुस्लीम कोणत्याही पद्धतीने लग्न केलेलं नाही, अशा चर्चा आहेत.
-
‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, स्वरा व फहादने कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्न केले नाही. दोघांनी हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले होते.
-
त्यांचा हिंदू विवाह किंवा मुस्लीम पद्धतीने निकाह होणार नाही.
-
स्वराच्या हाताला मेहेंदी, लाल बांगड्या, नाकात नथ, माथापट्टी आणि केसांत गजरा दिसत. स्वरा तेलुगू नवरीप्रमाणे सजली होती. शिवाय लग्न असूनही स्वराचा लूक अगदी साधा आहे असंही नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम, फेसबुक)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश