-
अभिनेत्री स्वरा भास्कर व फहाद अहमद यांचा रिसेप्शन सोहळा गुरुवारी दिल्लीत पार पडला.
-
स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत.
-
रिसेप्शनसाठी स्वराने गुलाबी रंगाचा लेहेंगा निवडला होता, तर फहादने ऑफ व्हाइट शेरवानी घातली होती.
-
लेहेंग्याबरोबर हेव्ही दागिन्यांनी स्वराने तिचा लूक पूर्ण केला.
-
फहाद व स्वराच्या रिसेप्शनला अनेक राजकारणी मंडळींनी हजेरी लावली.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी स्वरा-फहादच्या रिसेप्शनला पोहोचले होते.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली.
-
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
-
समाजवादीच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चनदेखील रिसेप्शनला पोहोचल्या होत्या.
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शशी थरूर यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली.
-
अनेक राजकीय पक्षातील नेते स्वरा-फहादच्या रिसेप्शनला पोहोचले.
-
स्वरा व फहादच्या लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या कव्वाली नाइटला समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव पोहोचले होते. (सर्व फोटो – स्वरा भास्करचे इन्स्टाग्राम व सोशल मीडियावरून साभार)
“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस