-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे.
-
नुकतंच तिने प्रेम आणि करिअर याबद्दल भाष्य केले आहे.
-
‘झी युवा सन्मान २०२३’ या कार्यक्रमात तिला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
-
त्यावेळी तिने याला मजेशीररित्या उत्तर दिलं.
-
“प्रेम ही सुंदर गोष्ट आहे. जगातील सर्वात शक्तीशाली गोष्ट आहे.”
-
“प्रेमाने मोठ्यातील मोठा डोंगरही हलू शकतो. अर्थात आता जे आपण अवतीभवती असलेलं प्रेम हे मला उथळ वाटलं.”
-
“कित्येकदा प्रेमापेक्षा जास्त तडजोड असतं असे मला वाटतं.”
-
“आर्थिक गोष्टींसाठीही कधी कधी प्रेम केले जाते.”
-
“तर कधीतरी रडायला खांदा हवा किंवा समाजाला दाखवायला काही तरी हवं, म्हणूनही प्रेम केले जाते.”
-
“हल्लीचं प्रेम हे या पातळीवर झुकतंय की काय असं वाटतं.”
-
“पण माझा प्रेमावर नक्कीच विश्वास आहे. खरं प्रेम हे नक्कीच आहे, असे मला वाटतं.”
-
“त्यामुळे करिअर आणि प्रेमात एखादी गोष्ट निवडणं फार कठीण आहे.”
-
“करिअर ही माझ्यासाठी माझी जीवन पद्धती आहे.”
-
“कलाक्षेत्रात काम करणं, समाजभान बाळगून काही तरी करत राहणं हे आधीपासूनच माझ्यात आहे. त्याचं मी काहीही करु शकत नाही.”
-
“मी इतके पैसे कमवेन आणि घरी बसेन असं कधीच होणार नाही.”
-
“इतके हिट चित्रपट दिले त्यानंतर रामराम असंही मी कधी करणार नाही.”
-
“करिअरची माझी व्याख्याही वेगळी आहे. ऑक्सिजन, अन्न, वस्त्र, निवारा आणि कला ही माझी व्याख्या आहे.”
-
“काहीतरी सतत करत राहणं ही माझी गरज आहे. त्यामुळे करिअर आणि प्रेम यात निवड करु शकत नाही.” असे प्राजक्ता माळी म्हणाली.

६ एप्रिल पंचांग: रामनवमी कोणत्या राशीसाठी ठरणार भाग्यशाली? कोणाला मिळणार प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी? वाचा राशिभविष्य