-
कलाकार मंडळींच्या लग्नसोहळ्याची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते.
-
अशाच एका अभिनेत्रीच्या शाही विवाहसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
ती अभिनेत्री म्हणजे कृष्णा मुखर्जी. कृष्णाने बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालाबरोबर लग्नगाठ बांधली आहे.
-
तिच्या लग्नापूर्वीच्या विधींचे तसेच लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
आता कृष्णाने तिच्या लग्नामधील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमुळे कृष्णाला ट्रोल करण्यात येत आहे.
-
कृष्णाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पती चिरागच्या अधिक जवळ आलेली दिसत आहे.
-
इतकचं नव्हे तर लग्नातील पाहुणे मंडळींच्या समोरच कृष्णा नवऱ्याला किस करत होती.
-
लिपलॉक करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत.
-
यानंतर नेटकऱ्यांनी कृष्णाला चांगलंच सुनावलं आहे. थोडी तरी लाज बाळगा, किस करण्याची काय गरज होती, हे सगळं तुम्ही नंतरही करू शकता अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी कृष्णाच्या फोटोंवर केल्या आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल