-
‘बिग बॉस’ फेम शालिन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे.
-
दलजितने निक पटेलबरोबर लग्नगाठ बांधली आहे. दलजीतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
-
कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दलजित व निकचं लग्न थाटामाटात पार पडलं.
-
लग्नाआधी दलजितच्या हळदी, संगीत व मेहेंदी कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
लग्नासाठी दलजितने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
-
लाल रंगाची ओढणी व मॅचिंग ज्वेलरीने दलजितने खास लूक केला होता.
-
तर निकही पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत होता.
-
दलजीतने २००९ साली अभिनेता शालिन भानोतशी लग्नगाठ बांधली होती. परंतु, अवघ्या सहा वर्षांतच त्यांचा संसार मोडला.
-
२०१५ साली घटस्फोट घेत दलजित व शालीन वेगळे झाले. त्यांना जेडन हा मुलगा आहे.
-
दलजीतप्रमाणेच निकचंही हे दुसरं लग्न आहे.
-
निक व दलजीत एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतात. तिथेच त्यांची ओळख झाली.
-
आता विवाहबंधनात अडकून त्या दोघांनीही नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. निकला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत.
-
दलजीत व निकच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
दलजीत व निकच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (सर्व फोटो: दलजीत कौर/ इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार