-
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याचा सण.
-
मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे.
-
‘ठरलं तर मग’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘सहकुटुंब सहपरिवार’ आणि ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.
-
वाहिनीवर सध्या टीआरपीत नंबर वन असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा केली जाणार आहे.
-
‘ठरलं तर मग’मध्ये अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने ते गुढीची पूजा करणार आहेत.
-
‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते.
-
गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे.
-
यावर्षी मात्र पश्या नाही त्यामुळे पूजा होणार की नाही अश्या विचारत असताना पश्या गुपचूप पुजेची तयारी करुन जातो.
-
त्यामुळे सरु वहिनीला खात्री आहे की पश्या आसपासच आहे.
-
यंदा पश्यासाठी मोरे कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारणार आहेत.
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीप गौरीसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.
-
दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे लक्ष्मीबरोबर जयदीप-गौरी गुढीपाडवा साजरा करणार आहेत.
-
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतही कानेटकर कुटुंबाने आनंदाची गुढी उभारली आहे.
-
तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह /इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”