-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राणी मुखर्जी. तिचा वाढदिवस आहे.
-
१९९६ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत राणीने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
‘कुछ कुछ होता है’, ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘मर्दानी’, ‘मर्दानी २’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले.
-
मोजक्याच पण आशयघन चित्रपटांमध्ये काम करणारी राणी मुखर्जी कोट्यवधींची मालकीण आहे.
-
राणी पती आदित्य चोप्रा आणि मुलगी आदिरासोबत मुंबईत राहात असली तरी तिने वेगवेगळ्या ठिकाणी घरं विकत घेतली आहेत. मध्यंतरी तिने एक अपार्टमेंट घेतलं होतं. ज्याची किंमत ७ कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं गेलं होतं.
-
तिला गाड्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे Audi A8 W12 आहे ज्याची किंमत सुमारे २ कोटी आहे. याशिवाय तिच्याकडे मर्सिडीज एस क्लास आणि मर्सिडीज बेंझ ई क्लास या गाड्याही आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीची एकूण संपत्ती १२ मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे ९० कोटी आहे.
-
राणीचा पती आदित्य चोप्रा हा यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्यची एकूण खासगी संपत्ती ६५०४ कोटींहून अधिक आहे.
-
राणीचा पती आदित्य यशराज फिल्म्समधूनच वर्षाला सुमारे ९६१ कोटी रूपये कमावतो.
![US Illegal Immigrants deported](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Latest-Marathi-News-2025-02-06T085413.429.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा