-
चित्रपटाच्या सेटवर बॉलीवूड कलाकारांमधील भांडणे ही एक सामान्य गोष्ट आहे. बॉलीवूडमधील भांडणाचे असे अनेक किस्से आणि घटना आपण ऐकले आणि पाहिल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या बोलणंच नाही तर एकमेकींसमोर येण्यासह टाळतात.
-
या यादीत दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघी बॉलिवूडच्या टॉप हॉट अभिनेत्रींपैकी एक आहेत.
-
असे म्हटले जाते की, दीपिका आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, रणबीर आणि कतरीनामध्ये जवळीक वाढली.
-
वाढत्या जवळकीनंतर रणबीरने दीपिकाशी ब्रेकअप केले. तेव्हापासून दीपिका आणि कतरिनाचे नाते बिघडले, जे आजतागायत सुधारले नाही.
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यातील युद्धही खूप जुने आहे. दोघी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
-
एकेकाळी जिवलग मैत्रिणी मानल्या जाणाऱ्या या दोघी आज एकमेकींसमोरही येत नाहीत.
-
त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, ‘चलते चलते’ या चित्रपटात ऐश्वर्याला पहिल्यांदा शाहरुख खानसोबत नायिकेच्या भूमिकेत कास्ट करण्यात आलं होतं. त्यावेळी ऐश्वर्या सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि सलमान सेटवर खूप गोंधळ घालायचा. यानंतर निर्मात्यांनी ऐश्वर्याला सोडून राणी मुखर्जीला चित्रपटात नायिका म्हणून कास्ट केले. यामुळे ऐश्वर्या राणीवर चिडली होती.
-
बॉलीवूडच्या दोन सुपर हॉट अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्यातही ३६ चा आकडा आहे.
-
‘ऐतराज’ चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारूनही प्रियांका चोप्राचे कौतुक होत असताना आणि करीनाला कमी लेखण्यात आल्याने दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
-
‘कॉफी विथ करण’ मधील प्रियांकाच्या उच्चारावर करीनाने टिप्पणी केली आणि तिला खोटे म्हटले तेव्हा हे मतभेद मोठ्या भांडणात बदलले.
-
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि जया बच्चन यांच्यातील युद्ध जगाला माहीत आहे. दोघांमधील युद्धाचे कारणही सगळ्यांना माहीत आहे.
-
जया आणि रेखाच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण बनले बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन. अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा आजवर इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे.
-
त्यामुळे रेखा आणि जया यांच्यातील अंतर वाढत गेले, जे आजही कायम आहे.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”