-
प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. ती २५ वर्षांची होती.
-
आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं.
-
आकांक्षा दुबे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती.
-
तिच्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
-
आकांक्षा दुबेला ‘भोजपुरी क्वीन’ या नावाने ओळखले जायचे.
-
आकांक्षा दुबेचा जन्म मिर्झापूरच्या विंध्याचलमध्ये झाला.
-
आकांक्षा ही ३ वर्षाची असतानाच ती तिच्या आई-वडिलांबरोबर मुंबईत स्थायिक झाली.
-
आकांक्षाने आयपीएस अधिकारी व्हावे, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण तिची स्वप्नं मात्र वेगळी होती.
-
आकांक्षा दुबेला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे.
-
तिला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते.
-
तिची मैत्रीण पुष्पांजली पांडे हिने आकांक्षाची सिनेसृष्टीतील काही लोकांशी गाठभेट करुन दिली. तसेच तिच्या स्वप्नांना पाठिंबाही दिला.
-
आकांक्षाच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय दोन भाऊ देखील आहेत. यातील एकाचे नाव आदित्य तर दुसऱ्याचे ओम असे आहे.
-
टिकटॉक व इन्स्टाग्राम रील्समधून प्रसिद्धी मिळवलेल्या आकांक्षा दुबेने वयाच्या १७ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
ती एसआरके म्युझिकबरोबर एका भोजपुरी अल्बममध्ये झळकली होती.
-
पण तिच्या या म्युझिक अल्बमला तितके यश मिळाले नाही. त्यामुळे ती नैराश्यात गेली.
-
तिने २०१८ मध्ये सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. तिने भोजपुरी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.
-
पण आईच्या सांगण्यावरुन ती पुन्हा काम करण्यास तयार झाली आणि पुन्हा सिनेसृष्टीत सक्रीय झाली.
-
आकांक्षा दुबे ‘मेरी जंग मेरा फैसला’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘वीरो के वीर’, ‘फायटर किंग’, ‘कसम बदना वाले की २’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात झळकली.

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!