-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार राम चरण तेजाचा आज ४८वा वाढदिवस आहे
-
२७ मार्च १९८५ साली जन्मलेल्या राम चरण आज तेलगू सिनेमाचा सुपस्टार म्हणून ओळखला जातो.
-
रामने आपल्या अभिनय कौशल्याने आणि साधेपणाने लोकांना असे वेड लावले आहे की प्रत्येकजण त्याच्या स्टाईलचा चाहता झाला आहे.
-
वडिल चिरंजीवी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत राम चरणने तेलगु चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
-
राम चरणने २००७ मध्ये ‘चिरुथा’ सिनेमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचा दुसरा सिनेमा एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘मगधीरा’ हा होता. या सिनेमातून राम चरणची लोकप्रियता वाढत गेली.
-
अभिनेत्या व्यतरिक्त राम चरण एक व्यवसायिकही आहे.
-
राम चरण ९० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या आलिशान बंगल्यात राहतो. या बंगल्यात अनेक अत्याधुनिक सोयी- सुविधा आहेत.
-
राम चरणला महागड्या गांड्यांची आवड आहे.
-
२०१२ मध्ये त्याने उपासना कमिनेनीसोबत लग्न केले.
-
राम चरण आणि उपासना कॉलेजपासूनचे मित्र आहेत
-
उपासना अपोलो रुग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष प्रताप रेड्डी यांची नात आहे. उपासना स्वतः अपोलो चॅरिटीची उपाध्यक्ष आहे आणि बी पॉझिटीव्ह मासिकाची संपादिका आहे.
-
नुकतास राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला.
-
राम चरणनचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही आहे. अभिनेत्यासोबतच तो एक व्यावसायिकही आहे.
-
तो हैदराबाद येथील पोलो रायडिंग क्लबचा मालक असून चॅनल ‘मां टीव्ही’च्या संचालक मंडळातील एक सदस्य आहे.
-
बॉक्स ऑफिसवर आपल्या चित्रपटांनी दहशत निर्माण करणारे राम चरण १३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”