-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये काम करत आहे.
-
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रियांका सगळं सोडून हॉलिवूडमध्ये काम करत आहे.
-
अचानक तिने तिकडे स्थायिक होण्याचा आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेकांना धक्का देणारा होता, पण यामागचं कारण नेमकं काय, याचा खुलासा आता तिने केला आहे.
-
प्रियांकाने २०१२ मध्ये ‘इन माय सिटी’ या गाण्यातून इंटरनॅशनल सिंगिंग डेब्यू केले होते. आता जवळपास ११ वर्षांनी तिने बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला होता, याबद्दल खुलासा केला आहे.
-
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट शो ‘आर्मचेयर एक्सपर्ट’मध्ये हजेरी लावली.
-
यावेळी तिने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडून गायनाला सुरुवात का केली आणि अमेरिकेत का काम शोधू लागली, याचा खुलासा केला.
-
प्रियांका म्हणाली, “मला बॉलिवूडमध्ये जे काम मिळत होतं, त्यापासून मी खूश नव्हते. मला ‘देसी हिट्स’च्या अंजली आचार्यने एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहिल्यावर फोन केला होता. त्यावेळी मी ‘सात खून माफ’ची शूटिंग करत होते.”
-
“तिने मला अमेरिकेत म्युझिक करिअर करण्यात तुला रस आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर मी बॉलिवूडमधूल काढता पाय घेण्याच्या तयारीत होते.”
-
“मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. मला चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी होत्या.”
-
“मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता,” असं प्रियांका म्हणाली.
-
प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, “मला म्युझिकने जगाच्या दुसऱ्या भागात जाण्याची संधी दिली.”
-
जे चित्रपट मला करायचे नव्हते, ते करण्याची मला आवडही नव्हती.
-
पण, मला क्लब आणि लोकांच्या काही गटांना चांगल्या कामासाठी आकर्षित करावं लागायचं.
-
त्यासाठी मेहनत करावी लागायची, तेव्हापर्यंत मी खूप काम केलं. पण म्युझिकची ऑफर आल्यावर मी म्हणाले की खड्ड्यात जा, मी तर अमेरिकेला निघाले,” असं प्रियांका म्हणाली.
-
(सर्व फोटो – प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेस)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख