-
प्रसिद्ध नाटककार व अभिनेते पियुष मिश्रा त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओखळले जातात.
-
त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. ते संगीतकारही आहेत, तसेच ते कविताही लिहितात. पियुष मिश्रा यांनी आपल्या जीवन प्रवासाला पुस्तकाचे रूप दिले आहे.
-
पियुष यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याला ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ असं नाव दिलंय.
-
पहिल्यांदा पियुष मिश्रा १०वीत असताना प्रेमात पडले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते प्रेमात पडले, तेव्हा ते कॉलेजमध्ये होते. त्यावेळी ते २० वर्षांचे होते.
-
वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी डॉक्टर बनण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण त्याचवेळी कलेची आवड असल्याने ते कला मंदिरातही जायचे.
-
तिथे त्यांची भेट एका २८ वर्षांच्या मुलीशी झाली. ते त्या मुलीची निरागसता व सौंदर्याच्या प्रेमात पडले. रोज ते सायकल घेऊन त्या मुलीला घरी सोडायला जायचे आणि वाटेत पाणीपुरी खायचे.
-
ग्वाल्हेर शहर लहान होते आणि लोक पियुषच्या वडिलांना ओळखत होते. त्यामुळे या दोघांबद्दल कोणीतरी घरी सांगितलं. खरं तर ते दोघेही मित्र होते, पण त्या काळी मुलीबरोबर फिरणं मोठी गोष्ट होती.
-
ही बातमी कळताच पियुष यांच्या आई संतापल्या. ती मुलगी जिथे काम करायची, तिथे त्या पोहोचल्या आणि त्यांनी त्या मुलीला सुनावलं.
-
पियुष यांना हा प्रकार कळताच त्यांनी रागाच्या भरात आपल्या हाताची नस कापली.
-
पियूष यांनी पुस्तकात लिहिलंय, “सर्वजण ड्रॉईंग रूममध्ये बसले होते. मी सरळ माझ्या खोलीत गेलो आणि दरवाजा बंद केला. ब्लेड काढले आणि हाताची नस कापली.”
-
पुढे ते म्हणाले, “त्या दिवसापासून वडील आणि मुलाचे नाते संपुष्टात आले. नंतर आयुष्यभर मी वडिलांना सर म्हणायचो.”
-
काही काळानंतर पीयूष यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि ते दिल्लीला आले.
-
इथं त्यांची भेट प्रियाशी झाली, दोघांची लव्ह स्टोरी खूप फिल्मी होती.
-
दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला आता २८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
पियुष आणि प्रिया यांना जोश आणि जय ही दोन मुलं आहेत.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच