-
अलीकडेच प्रियांका चोप्राने खुलासा केला की जेव्हा निक जोनसने तिला पहिल्यांदा मेसेज पाठवला तेव्हा ती रिलेशनशिपमध्ये होती.
-
प्रियांकाने आपल्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव न घेता सांगितले की, त्यांचं नातं खूपच खराब होतं.
-
त्यामुळे जेव्हा निकने तिला मेसेज केला, तेव्हा तिने चॅट करण्यास होकार दिला.
-
२०१६ मध्ये निक जोनसने पहिल्यांदा प्रियांकाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता.
-
तिने सांगितले की, सुरुवातीला ती निकशी बोलण्यास कचरत होती.
-
प्रियांका मुलाखतीदरम्यान म्हणाली, मी ३५ वर्षांची होते आणि निक फक्त २५ वर्षांचा होता.
-
सुरुवातीला काही दिवस बोलल्यानंतर मला यात जास्त पुढे जायचं नव्हतं.
-
निक आणि माझ्या वयात खूप अंतर होतं, पण आमच्या कॉमन मित्रांना वाटायचं की आम्ही भेटायला हवं, पण मला त्यात फार रस नव्हता.
-
निकने प्रियांकाला ट्विटरवर मेसेज केला आणि दोघांनी नंबर एक्सचेंज केले.
-
निक आणि प्रियांका यांची पहिली भेट २०१७ मध्ये मेट गालामध्ये झाली आणि मे २०१८ मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली.
-
दोन महिन्यांनंतर त्यांनी एंगेजमेंट केली व १ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी लग्न केलं होतं.
-
“मला आयुष्यात सेटल व्हायचं होतं आणि निक त्यावेळी फक्त २५ वर्षांचा होता, त्यामुळे तो लग्न आणि मुलांसाठी तयार नसेल, असं मला वाटलं होतं.”
-
“मला लहान मुलं खूप आवडतात आणि मला आई व्हायचं होतं, पण निक यासाठी तयार नसेल, असं मला वाटायचं, त्यामुळे मला त्याला डेट करायचे नव्हते,” असा खुलासा प्रियांका चोप्राने केला.
-
दरम्यान, प्रियांका चोप्रा व निक जोनस यांना एक मुलगी असून तिचं नाव मालती मेरी आहे.
-
(सर्व फोटो – प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेस)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक