-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरकडे पाहिले जाते.
-
आकाश ठोसरने ‘सैराट’ या चित्रपटात ‘परश्या’ ही भूमिका साकारली होती.
-
आकाश ठोसर हा लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
-
त्यातच आता आकाश ठोसरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून आकाश ठोसर हा विवाहबंधनात अडकणार असल्याचेही बोललं जात आहे.
-
नुकतंच ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत आकाशने त्याच्या ड्रीम गर्लबद्दल सांगितले.
-
यावेळी आकाशने त्याला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे? याबद्दलही भाष्य केले.
-
“मला लग्नासाठी अशी मुलगी हवी आहे जिला बिरयानी खूप छान बनवता येईल.”
-
“मला तिच्याशी लग्न करायला नक्की आवडेल.”
-
“कारण ज्या मुलीला बिरयानी बनवता येते, तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो.”
-
“मला अजून तरी अशी कोणीही मुलगी मिळालेली नाही”, असे आकाश यावेळी म्हणाला.
-
आकाशचे हे उत्तर ऐकून नागराज मंजुळेंनी त्याची मस्करी केली.
-
“आकाश उगाचच काहीही सांगू नकोस, उद्या अनेक मुली घरी बिरयानी घेऊन येतील”, असे नागराज मंजुळे म्हणाले.
-
त्यावर आकाशने “त्यांना प्रमोशन सुरु आहे, हे कळेल ना?” असे म्हटलं.
-
दरम्यान आकाश ठोसर हा लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल