-
समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी २०२१ मध्ये घटस्फोट घेत वेगळी झाली.
-
समांथा व नागाचैतन्यच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला होता.
-
२०१७मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याचा अवघ्या चारच वर्षात संसार मोडला.
-
समांथाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नागाचैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुपिलाला हिला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
काही दिवसांपूर्वी नागाचैतन्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये शोभिता धुपिलालाही दिसत होती.
-
या फोटोनंतर नागाचैतन्य व शोभिता धुपिलालाच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
-
नागाचैतन्यच्या डेटिंगच्या चर्चांवर पूर्वाश्रमीची पत्नी व सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने प्रतिक्रिया दिली आहे.
-
नागाचैतन्याच्या डेटिंगच्या चर्चांवर समांथाने एका मुलाखतीत भाष्य केलं.
-
“कोण कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, या गोष्टीमुळे मला फरक पडत नाही,” असं समांथा म्हणाली.
-
पुढे ती म्हणाली, “ज्या व्यक्तींना प्रेमाची किंमत नसते त्यांनी कितीही लोकांना डेट केलं तरी शेवटी डोळ्यांत अश्रूच येतात.”
-
“त्याने त्या मुलीला तरी आनंदी ठेवलं पाहिजे. स्वभाव बदलून मुलीच्या भावना न दुखावता त्याने तिची काळजी घेतली, तर हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे,” असंही ती म्हणाली.
-
दरम्यान, समांथा तिच्या आगामी ‘शंकुतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे.
-
समांथाचा हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम, इंडियन एक्सप्रेस)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…