-
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
साऊथमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
-
लवकरच ती अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्याबरोबर गूडबाय चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
-
‘पुष्पा’ चित्रपटात गरीब मुलीची भूमिका साकारणारी रश्मिका खऱ्या आयुष्यात राजकन्येसारखं आयुष्य जगते. ती करोडो रुपयांची मालकीण आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाची एकूण संपत्ती ४५ कोटींहून अधिक आहे. यासोबतच ती दर महिन्याला ४० लाख रुपयांपर्यंत कमावते.
-
अभिनय, परफॉर्मन्स, मॉडेलिंग आणि जाहिराती यातून ती एका वर्षात पाच कोटींहून अधिक कमावते.
-
याशिवाय ती चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी भरमसाठ फी घेते.
-
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री एका चित्रपटासाठी चार कोटी रुपये घेते.
-
रश्मिका आलिशान घरात राहते. तिची अनेक शहरात महागडी घरे आहेत.
-
कर्नाटकात ती आपल्या कुटुंबासोबत एका आलिशान घरात राहते, या घराची किंमत सुमारे आठ कोटी आहे.
-
याशिवाय हैदराबाद आणि मुंबईत तिची सर्व सोयींयुक्त घरे आहेत.
-
रश्मिकाला महागड्या गाड्यांचीही आवड आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.
-
तिच्याकडे एक कोटीची मर्सिडीज सी क्लास, ६० लाख रुपयांची ऑडी क्यू ३ आणि रेंज रोव्हर सारख्या आलिशान कार आहेत.
-
याशिवाय रश्मिका महागड्या हँडबॅग कॅरी करण्यासाठीही प्रसिद्ध आहे.
-
तिच्या एका बॅगेची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे.

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा