-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ला ओळखले जाते.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून वनिता खरातला ओळखले जाते.
-
या कार्यक्रमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.
-
वनिता खरातच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस प्रचंड वाढ होताना दिसत आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे ती नावारुपाला आली.
-
त्याचबरोबर तिने मराठीसह हिंदी चित्रपटामध्ये काम करत एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केलं.
-
कामामुळे चर्चेत असणारी वनिता खरात कबीर सिंग या चित्रपटात झळकली होती.
-
अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटात तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.
-
यानंतर तिला मराठीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटांच्याही ऑफर्स मिळाल्या.
-
पण तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला.
-
नुकतंच एका मुलाखतीत वनिताने कबीर सिंगनंतर कोणत्याही हिंदी चित्रपटात काम न करण्याबद्दलचं कारण सांगितलं आहे.
-
“मला कबीर सिंग या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांसाठी विचारण्यात आले.”
-
“हिंदी सिनेसृष्टीतील कास्टिंग टीमकडे माझे फोटो आहे.”
-
“पण कबीर सिंगमध्ये मी साकारलेल्या नोकराच्या भूमिकेमुळे मला त्याच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारणा झाली.”
-
“मला हिंदी सिनेसृष्टीत आजही तशाच भूमिका मिळतात.”
-
“पण एकदा तुमच्यावर नोकराच्या भूमिका करण्याचा शिक्का पडला की तो कायमच राहतो.”
-
“त्यानंतर पुढे देखील त्याच प्रकारच्या भूमिका तुमच्या वाट्याला येतात.”
-
“यामुळेच मी त्या केल्या नाहीत”, असे वनिता खरातने सांगितले.

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश