-
नाव बदललं आणि आयुष्यात एक मोठा बदल घडला किंवा नशीब पालटलं हे आपण बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्यांच्या किंवा अभिनेत्रींच्या बाबतीत घडलेलं पाहिलं आहे, पण तुम्हाला माहितीये का की फक्त नटच नव्हे तर गायक आणि गायिकांच्या बाबतीतही ही गोष्ट आपल्याला बघायला मिळेल.
-
सुनिधी चौहानने आपल्या आवाजाने लोकांना वेड लावले. आज तिचे नाव बॉलीवूडच्या टॉप गायकांमध्ये घेतले जाते.
-
पण तुम्हाला माहित आहे का सुनिधीचे खरे नाव निधी होते. कल्याणजी विरजी शाह यांनी तिचे नाव बदलून सुनिधी ठेवले. ‘सु’ हे अक्षर या गायिकेसाठी शुभ ठरेल असा त्यांचा विश्वास होता आणि अगदी तीच गोष्ट खरी ठरली.
-
बॉलिवूडमध्ये एकाहून एक सरस गाणी देणारा आणि खऱ्या अर्थाने पॉप कल्चर भारतात रुजवणाऱ्या शानचे नावसुद्धा या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
-
शानचे खरे नाव शंतनू मुखर्जी होते. पण इंडस्ट्रीत या नावाचे बरेच गायक असल्याने त्याने नाव बदलायचा निर्णय घेतला अन् त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. शानने हिंदी, उर्दू, मल्याळम, संस्कृत, तेलगू, नेपाळी, गुजराती, मराठी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
-
८० आणि ९० च्या दशकातील लोकांच्या मनात आपल्या मधुर आवाजाने घर करणाऱ्या कुमार सानू यांनाही नाव बदलावं लागलं होतं.
-
कुमार सानू यांचे खरे नाव केदारनाथ भट्टाचार्य होते.
-
प्रसिद्ध रॅपर आणि गायिका हार्ड कौरला कोण ओळखत नाही? गाणी आणि काही वादग्रस्त वक्तव्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेत आली आहे. भारतातील पहिली महिला रॅपर म्हणून तिला ओळखलं जातं.
-
हार्ड कौरने तिचे नावही बदलले होते. तिचे खरे नाव तरन कौर ढिल्लन आहे.
-
गेल्याच वर्षी लोकप्रिय गायक केके यांचं निधन झालं. अजूनही त्याच्या मृत्यूच्या बातमीवर कित्येक संगीतप्रेमींचा विश्वास बसत नाही.
-
तुमच्या चंचल स्वभावाला शांत करायचं, मनातील जखमेवर हळूच फुंकर घालायचं काम केकेने त्याच्या अविस्मरणीय गाण्यांमधून केलं.
-
या अवलियानेसुद्धा त्याचं नाव बदलून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. केकेचं खरं नाव होतं कृष्णकुमार कुन्नथ. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Aligarh Love Story: पळून गेलेले सासू-जावई दहा दिवसांनी परतले घरी, सासू आता म्हणते…