-
बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेटरच्या प्रेमात पडल्याच्या गोष्टी आपण ऐकतो. अशा अनेक जोड्याही आपण पाहिल्या आहेत. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्या राजकारण्यांच्या प्रेमात पडल्या आहेत.
-
परिणीतीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ती कधीही कोणत्याही राजकारण्याला डेट करणार नाही.
-
मात्र परिणीती आणि आप खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
या बातमीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहेत.
-
२०२३ च्या सुरुवातीला स्वरा भास्कर आणि सपा युवा नेता फहाद अहमद यांनी लग्न केले.
-
एनआरसीशी संबंधित आंदोलनादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांचे रुपांतर प्रेमात झाले.
-
स्वरा आणि फहादच्या लग्नाचे रिसेप्शन चर्चेचा विषय बनला होता
-
तेलुगू इंडस्ट्रीशी संबंधित प्रसिद्ध अभिनेत्री नवनीत कौर यांनी नेते रवी राणासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
-
लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.
-
आता त्या पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून सध्या अमरावतीच्या भाजपा खासदार आहेत.
-
‘टारझन द वंडर कार’ आणि ‘वॉन्टेड’मधून बॉलिवूडमध्ये छाप अभिनेत्री आयशा टाकियाने फरहान आझमीसोबत लग्न केले.
-
फरहान हा नेता अबू आझमी यांचा मुलगा आहे. तो व्यावसायिक असण्यासोबतच तो राजकारणातही सक्रिय आहे.
-
२००९ मध्ये आयशाने फरहानशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला.
-
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
-
२००६ मध्ये तिने कुमारस्वामी यांच्याशी लग्न केले लग्न केले.
-
दोघांनीही त्यांच्या लग्नाची गोष्ट बराच काळ लपवून ठेवली होती.

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई