-
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे हे कायमच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे.
-
या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
नागराज मंजुळे यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे.
-
नागराज मंजुळे यांनी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुलाखती दिल्या.
-
या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
-
नुकतंच ‘लोकमत’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला प्रपोजसह, क्रशबद्दल भाष्य केले.
-
तुम्ही पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं होतं? असा प्रश्न नागराज मंजुळेंना विचारण्यात आला होता.
-
त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले. “ही खूप जुनी गोष्ट आहे. आता ते सांगून काहीही अर्थ नाही”, असे ते म्हणाले.
-
“मला त्या गोष्टी आठवतात, पण आता त्या सांगण्यात काहीही अर्थ नाही”, असे नागराज मंजुळेंनी म्हटले.
-
यानंतर त्यांना तुमचा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण? असा प्रश्न विचारण्यात आला.
-
त्यावर ते म्हणाले, “मी लहान असल्यापासून मला श्रीदेवी फार आवडायच्या.”
-
“मी त्यांचे अनेक फोटोही जमा करुन ठेवायचो.”
-
“आता कोणीही क्रश नाही. आता सर्व क्रॅश झाल्यात”, असे नागराज मंजुळेंनी म्हटले.
-
दरम्यान ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख