-
आपल्याकडे हॉरर आणि स्लॅशर पठडीतले चित्रपट बघणाऱ्या लोकांची संख्या बरीच मोठी आहे. काहींना हे चित्रपट अजिबात बघवत नाहीत तर काही लोक अत्यंत आवडीने हे चित्रपट बघतात.
-
आज जगातील अशाच काही भयानक हॉरर आणि स्लॅशर चित्रपटांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. कमकुवत मनाच्या लोकांनी तर या चित्रपटांच्या वाट्याला अजिबात जाऊ नये.
-
स्लॅशर जॉनरमधला ‘रॉन्ग टर्न’ हा चित्रपट हा आजवरचा सर्वात भयानक स्लॅशर चित्रपटांपैकी एक मानला जातो. स्लॅशर म्हणजे एक मारेकरी लोकांचा पाठलाग करून त्यांना अत्यंत क्रूरपणे यमसदनी धाडतो. या चित्रपटात एवढी हिंसक दृश्यं होती की याचे पुढील काही भाग डीव्हीडीच्या माध्यमातून प्रदर्शित केले गेले.
-
याच पठडीतल्या १९९६ च्या ‘स्क्रीम’ या चित्रपटाचं नावही या यादीत अग्रस्थानी येईल. यातही पराकोटीची हिंसा दाखवण्यात आली आहे. जगातील बीभत्स चित्रपटांची यादी करायची ठरवली तर त्यात ‘स्क्रीम’ आणि त्याच्या काही भागांचा सहभाग करावाच लागेल.
-
१९७४ मध्ये आलेला ‘the texas chainsaw masscare’ या चित्रपटाचा ट्रेलरच तोंडचं पाणी पळवणारा होता. ५ मित्रांची ही भयावह कहाणी आजही बघताना आपली झोप उडते. ज्या शस्त्राने मोठमोठी झाडं कापली जातात त्याचा वापर माणसं मारण्यासाठी करण्यात आल्याचं दाखवलं आहे. जगातील सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे.
-
१९७८ च्या ‘डाउन ऑफ द डेड्स’ या चित्रपटाला झोंबी पठडीतला एक मास्टरपीस मानलं जातं. या चित्रपटाचा सीक्वल ‘डे ऑफ द डेड्स’ हा त्यांच्या पहिल्या भागाहून आणखी भयानक होता.
-
१९८० च्या ‘कॅनीबल होलोकॉस्ट’ हा या अशाच काही बीभत्स आणि भयानक चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे ज्याचे फोटोज तुम्हाला गुगलवरही सापडणार नाहीत. तुमचं मन कलुषित करणारा हा एक भयावच चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काही जनावरांना खरोखर मारण्यात आले होते.
-
‘ब्रेन डेड’ हा १९९२ साली प्रदर्शित झालेला असाच एक भयानक चित्रपट. आजवर दाखवलेल्या चित्रपटापैकी हा सर्वात जास्त रक्तपात असलेला चित्रपट मानला जातो. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’च्या दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला. एका लहान मुलाच्या आईला उंदीर अन् माकडसदृश दिसणाऱ्या एका प्राण्याने चावलं आहे आणि त्यानंतर पुढे जे काही आपल्याला बघायल मिळतं ते कमकुवत मन असलेल्या लोकांना बघता येणं शक्य नाही.
-
‘हाय टेंशन’ हा २००३ मधील सर्वात क्रूर फ्रेंच चित्रपट आहे. आपल्या मैत्रिणीला एक सिरियल किलरपासून वाचवू पाहणाऱ्या एका महिलेवर हा चित्रपट आहे. गळा कापण्याचे क्रूर सीन्स, तसेच काही यौन शोषणाचे सीन्स, आणि इतरही बऱ्याच बीभत्स गोष्टी या चित्रपटात बघायला मिळतात. (फोटो सौजन्य : आयएमडीबी आणि इंडियन एक्सप्रेस)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”