-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात.
-
गायिका आणि समाजसेविका अमृता फडणवीस ०९ एप्रिल रोजी ४४ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते.
-
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची लव्हस्टोरी फारच खास आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.
-
त्यांना देव, देश आणि धर्मासाठी संपूर्ण जीवन वाहण्याचे ठरवले होते.
-
देवेंद्र यांच्या आई सईताई यांना त्यांचा लग्न न करण्याचा निर्णय अजिबात मान्य नव्हता.
-
लग्न करण्याबाबत आईच्या आग्रहामुळे त्यांनी दोन-चार फोटो पाहण्यासही होकार दिला.
-
एकेदिवशी देवेंद्र फडणवीसांना अमृता रानडेंचं स्थळ आलं आणि फडणवीसांनी त्यांचा निर्णयच बदलला.
-
अमृता यांचा फोटो फडणवीसांनी पाहिला, त्यांचा नंबरही त्यांनी घेतला.
-
गाठीभेटी वाढल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.
-
त्यांनी पहिल्याच भेटीमध्ये अमृता यांना एक फिल्मी लाइन ऐकवली होती.
-
देवेंद्र फडणवीस पहिल्याच भेटीत अमृता यांना तुम्ही काजोलसारख्या दिसता, ती माझी फेवरेट आहे.
-
त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमृता रानडेंच्या प्रेमात पडले आणि लग्न करत सांसारिक जीवन स्वीकारलं.
-
लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी अमृता आणि देवेंद्र यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या.
-
फडणवीसांची अशी अट होती की, “मी एक रुपया पण तुला देणार नाही आणि मी तुझ्याकडून पण घेणार नाही.”
-
“आयुष्यभर राजकारण करेन, नोकरी-धंदा करणार नाही.”
-
तर अमृता यांचं असं म्हणणं होतं की, “निर्व्यसनी असेल तरच लग्न करेन.”
-
“देवेंद्रजींचं स्थळ माझ्या आईवडिलांना आवडलं होतं.”
-
“तू तुझी नोकरी सुरू ठेव,” असं देवेंद्रजींनी मला सांगितलं.
-
“माझं राहणीमान आणि विचार राजकीय वातावरणाला सुटेबल नव्हते आणि देंवेंद्रजींना अशीच बायको हवी होती.”
-
आम्ही दोघांनीही या अटी मान्य केल्या. आतापर्यंत त्या तंतोतंत पाळल्या.
-
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस डिसेंबर २००५ मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
-
लग्नाला मोजकीच मंडळी असा त्या दोघांचाही हट्ट होता.
-
त्यासाठी त्यांनी मोजून ५००-६०० लोकांनाच आमंत्रण दिले होते.
-
पण देवेंद्र फडणवीसांचे अनेक कार्यकर्ते, समर्थक आमंत्रण न देता लग्नाला पोहोचले होते.
-
त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या लग्नाला २० हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती.
-
सुरुवातीच्या काळात त्या देवेंद्र फडणवीसांना सर म्हणून हाक मारायच्या.
-
कालांतराने अमृता त्यांना ‘देवेन’ या नावाने हाक मारु लागल्या.
-
त्यांना दीविजा नावाची मुलगीही आहे.
-
अमृता एक बँकर असण्याशिवाय गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत.
-
त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील गाणीही गायली आहे.
-
त्यांच्या गाण्यांना युट्यूबवर मिलियन्समध्ये Views आहेत.
ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या