-
मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच ते चर्चेत असतात.
-
त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी नुकतेच त्यांचे स्वतःचे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर सुरू केले.
-
याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला आणि या प्रसंगीदेखील त्यांचा राजेशाही थाट दिसून आला.
-
या व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींमुळे अनेकदा सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते.
-
मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील अनेक महागड्या गाड्या आहेत. या गाड्या चालविण्यासाठी त्यांच्याकडे निष्णात ड्रायव्हरही आहेत.
-
त्या ड्रायव्हरना अंबानी महिन्याला जितका पगार देतात तितका पगार एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही नसेल.
-
मिंटने दिलेल्या रिपोर्टनुसार,, मुकेश अंबानी त्यांच्या पर्सनल ड्रायव्हरला २०१७ साली दर महिन्याला २ लाख रुपये देत होते. या ड्रायव्हरचा वर्षाचा पगार तब्बल २४ लाख रुपये होता. तर २०१७ ते २०२२ दरम्यान हा पगार आणखीन वाढला आहे.
-
प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्समधून मुकेश अंबानी त्यांच्या ड्रायव्हरची नेमणूक करतात. या ड्रायव्हर्सना त्यापूर्वी अनेक आलिशान गाड्या चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाते.
-
हे ट्रेनिंग त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केल्यावर त्यांची नेमणूक केली जाते. याचबरोबर त्यांचा विमाही काढला जातो.
(सर्व फोटो सौजन्य: ईशा अंबानी/इंस्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”