-
गौतमी पाटील हे नाव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत आहे.
-
एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
-
यावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर तिने माफी मागितली होती.
-
बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकारही घडला होता.
-
आता एका मुलाखतीत गौतमीने तिच्या आयुष्याबद्दल भाष्य केलंय.
-
तसेच गौतमीने तिचं खरं वय आणि लग्नासाठी तिला कसा जोडीदार हवाय, याबद्दलही सांगितलं आहे.
-
‘दॅट ऑड इंजिनिअर’ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत, त्या सांगितल्या.
-
या मुलाखतीत बोलताना तिने लग्नाबद्दल आणि तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल सांगितलं.
-
ती म्हणाली, “माझं आयुष्य तसं खडतरच गेलं. माझं शाळेतलं शिक्षण हे मुलींच्या शाळेत झालं.
-
बाबा सोडून गेल्यानंतर घरात कोणीही पुरुष नव्हता. मी आणि आई दोघीच होतो. ना वडील, ना भाऊ, ना नातेवाईक.
-
त्यामुळे माझा कोणत्याही पुरुषाशी फारसा संबंध आलेला नाही.
-
मी माझ्या आयुष्याची, आईची आणि घराची जबाबदारी उचलली.
-
आता घरातल्या अर्ध्या जबाबदाऱ्यांचा वाटा उचलण्यासाठी एक तरी पुरुष आयुष्यात असायला हवा असं वाटतं.
-
मला या ओझ्यातून थोडंसं मोकळं व्हायचं आहे. त्यासाठी मला लग्न करायचं आहे,” असं गौतमी म्हणाली.
-
लग्नासाठी कसा मुलगा हवा असं विचारताच गौतमी म्हणाली, “मला पैसे नको, बंगला, प्रतिष्ठा कशाचीच गरज नाही मला. पण माझ्या आयुष्यात जी आणि जशी परिस्थिती येईल त्याला माझ्यासोबत उभा राहून मला खंबीरपणे साथ देणारा नवरा हवा आहे.
-
जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन. आता माझं वय २५ आहे, मी लग्न केलेलं नाही, पण मलाही लग्न करायची इच्छा नक्कीच आहे,” असं ती म्हणाली.
-
दरम्यान, लवकरच गौतमी पाटील घुंगरू या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
सर्व फोटो – गौतमी पाटीलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”