-
टीव्हीवरील विनोदी शो ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकार सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत.
-
गेली अनेक वर्षे हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.
-
या शोमध्ये आपल्या विनोदाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या कलाकारांचा वैयक्तिक आयुष्यात मात्र वेगळाच संघर्ष आहे. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री स्नेहल शिदम होय.
-
. स्नेहलने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला होता, ज्यात उंदराने घातील जेवणाची नासाडी केल्यानंतर तिच्या वडिलांनी एक निर्णय घेतल्याचं ती म्हणाली होती.
-
‘इट्स मज्जा डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहलने तिच्या घराची गोष्ट सांगितली होती.
-
स्नेहल विलेपार्ले येथील चाळीत राहते. या चाळीमध्येच तिचं छोटसं घर आहे.
-
काही वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर स्नेहलच्या आई-वडिलांनी विलेपार्लेच्या चाळीमध्येच घर खरेदी केलं.
-
आधी छोटसं झोपडं होतं. त्यानंतर घराचं बांधकाम करुन घेतलं असं यावेळी स्नेहलने सांगितलं.
-
स्नेहल आणि तिच्या कुटुंबीयांनी खूप संघर्ष केला आहे. अवघ्या लहानशा घरातून ते चाळीत घर खरेदी करण्यापर्यंतचा संघर्षही खूप मोठा होता.
-
कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही तितकी चांगली नव्हीत. तिने एक डान्स शो करत असतानाचा किस्सा सांगितला.
-
स्नेहल म्हणाली, “मी डान्स शो करत होते आणि घरातलेही सगळेच बाहेर गेले होते. चाळ म्हटल्यावर घरात उंदीर असणारच.
-
घरात जेवण बनवून ठेवलं होतं, पण रात्री जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा उंदरांनी जेवणाची नासाडी केली होती.
-
तेव्हा माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की, आज मुलांच्या पुढ्यातलं अन्न गेलं आहे हे परत कधीच घडू नये म्हणून त्यांनी घर रिनोव्हेट करून घेतलं.”
-
स्नेहल कॉलेजला असल्यापासूनच घरात आर्थिक मदत करायची.
-
तर, तिची आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवण्याचं काम करायची.
-
या मुलाखतीत स्नेहलने तिच्या घराची आणि कुटुंबियांची गोष्ट सांगितलं.
-
शिवाय आपल्याला चाळीत राहत असल्याची कोणत्याच प्रकारची लाज वाटत नाही, असंही ती म्हणाली होती.
-
(सर्व फोटो – स्नेहल शिदमच्या इन्टाग्रामवरून साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”