-
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांच्या मनात याबद्दल खूप उत्सुकता होती.
-
कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.
-
या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
-
तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक सना शिंदेही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
-
महाराष्ट्र शाहीर चित्रपटात शाहीर साबळे यांच्या जीवनप्रवासात अनेक मोठमोठ्या व्यक्ती येऊन गेल्या.
-
या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टिझरमध्ये लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण या दिग्गज व्यक्तींची झलक पाहायला मिळत आहे.
-
शाहिरांच्या या जीवनपटामध्ये त्यांचे गुरु साने गुरुजी यांची व्यक्तिरेखा लोकप्रिय अभिनेता अमित डोलावत साकारणार आहे.
-
अमित डोलावत या आधी ‘लक्ष्य’ या मालिकेत झळकला होता. त्या मालिकेत त्याने अर्जुन करंदीकर नावाच्या पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती.
-
तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या भूमिकेत अतुल काळे दिसणार आहेत.
-
अतुल काळे हे ‘माझा होशील ना’ या मालिकेत झळकला होता.
-
तर मृण्मयी देशपांडे ही या चित्रपटात लता दिदींच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत अभिनेता दुष्यंत वाघ झळकताना दिसत आहे.
-
दुष्यंत वाघ हा ‘३ इडियट्स’ या चित्रपटात सेंटीमीटरच्या भूमिकेत झळकला होता.
-
‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेत तो झळकला होता. त्याने अनेक छोट्या भूमिका साकारल्या आहेत.
-
अभिनेत्री अश्विनी महांगडे देखील या चित्रपटात झळकणार आहे.
-
तर अभिनेत्री निर्मिती सावंत या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या आईच्या भूमिकेत झळकत आहेत.

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना