-
आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.
-
तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत.
-
रश्मिकाने २०१४ साली कूर्गमधून क्लीन एंड क्लियर फ्रेश फेस ही स्पर्धा जिंकली होती.
-
ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला याच ब्रॅंडची जाहिरात मिळाली.
-
याच फेसवॉशच्या जाहिरातीमध्ये एका दिग्दर्शकाची नजर तिच्यावर पडली आणि तिला तिचा पहिला ब्रेक मिळाला.
-
त्यानंतर तिने कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
-
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि मगच तिने या क्षेत्रात पाऊल टाकलं.
-
कूर्ग पब्लिक स्कूलमधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं.
-
त्यानंतर तिने रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, साइंस अँड कॉमर्स महाविद्यालयातून मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात बॅचलर पदवी मिळवली आहे.
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा