-
१९७९ साली प्रदर्शित झालेला ‘सिंहासन’ कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
त्याचनिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
-
याच कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी ‘सिंहासन’ चित्रपटादरम्यानच्या बऱ्याच आठवणीही सांगितल्या.
-
‘सिंहासन’नंतर जब्बार पटेल यांनी नाना यांना घेऊन चित्रपट केला नाही ही खंतदेखील नाना यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.
-
या मुलाखतीमध्ये नाना पाटेकरांनी नसीरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी नवस केला होता हा गमंतीशीर किस्सा त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितला.
-
याबद्दल बोलताना नाना म्हणाले, “सिंहासननंतर जब्बार यांनी मला कोणत्याच चित्रपटात घेतलं नाही. मराठीत जब्बार हे नेहमी मोहन आगाशे यांना चित्रपटात घेत. हिंदीत श्याम बेनेगल, गोविंद नीहलानी हे ओम पुरी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करत.”
-
नसीरुद्दीन शाह यांच्यासाठी केलेल्या खास नवसाबद्दल नाना पाटेकर पुढे म्हणाले, “मी खरंच सांगतो की मी देव मानत नाही यामागील कारण नसीरुद्दीन शाह. त्यावेळी मी नसीरुद्दीनला अपघात व्हावा, त्याचे हातपाय मोडावेत यासाठी बरेच नवस केले, जेणेकडून नसीरच्या भूमिका मला मिळतील.”
-
“पण तो नवस काही पूर्ण झाला नाही यामुळेच माझा देवावरचा विश्वास उडाला. पण अगदी खरं सांगतो यांच्या नशिबी जे होतं ते त्यांच्या पदरात पडलं. आम्हालासुद्धा नंतरच्या काळात भरभरून मिळालं.” असं नाना यांनी स्पष्ट केलं.
-
नसीरुद्दीन यांच्याबाबतीत नाना पाटेकर यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”