-
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तब्बू होय.
-
तब्बू ३ वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. ती आजी-आजोबांबरोबर राहायची.
-
तब्बूची आई शिक्षिका होती. आई शाळेत गेल्यावर आजी तिला कथा सांगायची.
-
तब्बूचं आवडनाव हाश्मी आहे. तिचं पूर्ण नाव तबस्सूम फातिमा हाश्मी आहे.
-
पण तिने कधीच तिचं पूर्ण नाव किंवा आडनाव वापरलं नाही.
-
ती शाळेत फातिमा आडनाव म्हणून वापरायची.
-
तब्बू म्हणाली होती की, तिला वडिलांचं आडनाव वापरावं, असं तिला कधीच वाटलं नाही.
-
ती नेहमी तिच्या नावासोबत फातिमा लावायची, तेच तिचं मधलं नाव आणि आडनाव होतं.
-
तब्बू म्हणाली की, ती पहिल्यापासून तिच्या नावासमोर हाश्मी लावत नाही.
-
“त्यांचं आडनाव लावणं माझ्यासाठी आवश्यक आहे असं मला कधीच वाटलं नाही. शाळेत मी माझ्या नावापुढे फातिमा लावायचे, जे माझं मधलं नाव होतं. मला त्यांच्या (वडिलांच्या) कोणत्याही आठवणी नाहीत. माझी बहीण त्यांना खूप वेळा भेटली आहे पण मला कधी त्यांना भेटावसं वाटलं नाही,” असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
“मी त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी कधीच उत्सुक नव्हते. मी ज्या मार्गावर आहे आणि ज्या मार्गाने माझं संगोपन झालं आहे त्यावर मी आनंदी आहे,” असंही तिने म्हटलं होतं.
-
(सर्व फोटो – तब्बूच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”