-
मराठी मध्यमवर्गीय घरातील मुलगी ते हिंदी चित्रपटातील ग्लॅमर गर्ल हा प्रवास अभिनेत्री अश्विनी भावे यांनी केला आहे.
-
अश्विनी यांना मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं. मात्र आवड म्हणून त्यांनी नंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
-
किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्नानंतर अश्विनी परदेशी स्थायिक झाल्या. परदेशी गेल्यावर अश्विनी यांनी तिथे फिल्ममेकिंगच्या चार वर्षांच्या कोर्सला प्रवेश घेतला.
-
परदेशी राहणाऱ्या अश्विनी दर वर्षी मुलांना घेऊन भारतात येतात.
-
मुलांना भारत कळला पाहिजे असं त्यांचं मत आहे.
-
सध्या त्या विविध वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखनसुद्धा करतात.
-
या स्तंभलेखनातून त्यांनी भारत- अमेरिका या दोन्ही देशातले अनुभव मांडतात.
-
अश्विनी भावे यांनी वेब विश्वात पदार्पण केलं. ‘द रायकर केस’ या वेब सीरिजच्या माध्यमातून कलाविश्वात पुन्हा पदार्पण केलं आहे.
-
लवकरच पार पडणाऱ्या मराठी द फिल्मफेअर सोहळ्यात सुद्धा आश्विनी भावे यांची खास उपस्थिती असणार आहे.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही