-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अभिनेता वैभव तत्त्ववादीला ओळखले जाते.
-
मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
-
वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांचे अफेअर असल्याच्या चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या.
-
त्यावर आता वैभव तत्त्ववादीने याबद्दल मौन सोडत भाष्य केले आहे.
-
वैभव तत्त्ववादीने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केले.
-
“कॉफी आणि बरंच काही नंतर अनेकांनी तुमचं अफेअर आहे, तुम्ही रिलेशनमध्ये आहात, अशा चर्चा होत्या”, असे विचारले असता, त्यावर त्याने फारच मजेशीररित्या उत्तर दिले.
-
त्यावर तो म्हणाला की, “चर्चा काय लग्न झालं अशा बातम्या देखील होत्या.”
-
“माझ्या आजीने आईला प्रश्नही विचारला होता की, वैभवने लग्न केलं आपल्याला सांगितलंही नाही.”
-
“पण प्रार्थनाबरोबर काम करताना एक वेगळीच मज्जा येते.”
-
“तिच्याबरोबरची केमिस्ट्री स्क्रीनवर पाहताना नक्कीच जाणवते.”
-
“मला असं कायमच वाटतं की तुम्ही इतर सहकलाकारांबरोबर ज्या पद्धतीने काम करताना जी काही मज्जा करता त्यालाच केमिस्ट्री म्हणतात.”
-
“प्रार्थनाबरोबर काम करताना आम्ही खूप धमाल करायचो. आम्ही इतके चांगले मित्र आहोत.”
-
“प्रार्थना मला कायमच सांगत असते की माझा नवरा जितका माझ्यावर रागवत नाही, तितका तू मला ओरडत असतो.”
-
“पण ते ठीक आहे, त्यालाच मैत्री आणि मित्रत्व म्हणतात.”
-
“आम्ही कॉफी आणि बरंच काही जेव्हा शूट करत होतो, त्यावेळी ती अजिबात फिटनेस फ्रीक वैगरे नव्हती.”
-
“मी तिला कायमच त्यावरुन ओरडायचो. जरा तब्येतीकडे लक्ष दे, व्यायाम कर.”
-
“पण आज जेव्हा मी तिला पाहतो, तेव्हा मला तिचा नक्कीच अभिमान वाटतो.”
-
“तिने स्वत:ला ज्या पद्धतीने फिटनेस फ्रीक बनवलं आहे, त्याबद्दल मला तिचे कौतुक आणि अभिमान दोन्हीही आहे.”
-
“एक अभिनेत्री म्हणून ती फारच गोड आहे.”
-
“माझ्याकडे तिच्या हसण्याचा एक व्हिडीओ आहे. मी आजही कधीही कंटाळलो, मला डिप्रेस झाल्यासारखं वाटलं की मी तिचा तो व्हिडीओ पाहतो.”
-
“तिचा हसण्याचा तो व्हिडीओ मी पाहिला की सर्व थकवा निघून जातो.”
-
“ती कायमच माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे”, असे वैभव तत्त्ववादीने म्हटले.
-
“तुला आणि प्रार्थनला एकत्र काम करायला कधी पाहायला मिळेल”, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
त्यावर तो म्हणाला, “मला आणि प्रार्थनाला पुन्हा एकत्र काम करण्याची खूप इच्छा आहे.”
-
पण आम्ही एकत्र चित्रपट केल्यानंतर अनेकजण सांगतात की काय मग तु्म्हीच सारखे सारखे चित्रपट करणार का?
-
त्यावर त्यांना सांगावं वाटतं की, “अरे शेवटचा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच वर्षे झाले.”
-
दरम्यान वैभव तत्त्ववादी हा सध्या त्याच्या ‘सर्किट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?