-
सलमान खानसुद्धा एका मोठ्या काळानंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्यास सज्ज आहे. २०१९ साली ‘दबंग ३’मध्ये सलमान दिसला. नंतर २०२१ मध्ये ‘अंतिम’मध्ये सलमान होता पण त्यात त्याची मुख्य भूमिका नव्हती.
-
आता तब्बल ३ वर्षांनी सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.
-
हा चित्रपट सलमानच्या करिअरला एक वेगळं वळण देऊ शकतो असं म्हंटलं जात आहे. भाईजानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरू शकतो यामागे प्रामुख्याने ५ कारणं सांगितली जात आहेत.
-
पहिलं कारण म्हणजे शाहरुख प्रमाणेच सलमानसुद्धा या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक करत असल्याने या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा आहेत.
-
दुसरं कारण म्हणजे ‘पठाण’प्रमाणेच हासुद्धा एक अॅक्शनने भरपूर असा मसालापट आहे, आणि सध्या लोकांना असेच चित्रपट अपेक्षित आहेत, यामुळे ‘किसी का भाई किसी की जान’ याबाबतीत प्रेक्षकांची निराशा करणार नाही अशी चर्चा आहे.
-
तिसरं कारण म्हणजे सलमान खानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा सुद्धा एक फॅमिली चित्रपट आहे. सलमानचे चित्रपट तुम्ही तुमच्या कुटुंबासह सह पाहू शकता कारण त्यात आक्षेपहार्य असं काहीच नसतं, यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लोकांना खेचून आणण्यात यशस्वी होईल असं म्हंटलं जात आहे.
-
चौथ कारण म्हणजे दाक्षिणात्य अभिनेता वेंकटेश हा बरेच वर्षांनी हिंदीत पुन्हा काम करताना दिसणार आहे. शिवाय राम चरणचीही झलक यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच साऊथ आणि बॉलिवूडचं हे कनेक्शन या चित्रपटासाठी खास ठरू शकतं.
-
पाचवं, शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे ईद. सलमान खान आणि ईद हे कनेक्शन वेगळं उलगडून सांगायची गरज नाही. सलमानचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट हे ईदच्याच दिवशी प्रदर्शित झाले आहेत.
-
यामुळेच ईद आणि सलमान खानचं खास नातं आहे. आता यंदाच्या ईदच्या निमित्ताने भाईजानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतोय ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…