-
मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
सायली तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. मध्यंतरी क्रिकेटपटु ऋतुराज गायकवाडबरोबर सायलीचं नाव जोडलं गेलं होतं.
-
शिवाय काही दिवसांपूर्वीच सायलीने पिवळा ड्रेस परिधान करुन फोटो पोस्ट केला होता.
-
या फोटोवरुन तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. यावर सायलीने आता भाष्य केलं आहे.
-
३ एप्रिलला पॉक स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपरजायंट्सवर १२ धावांनी शानदार विजय मिळवला होता.
-
यावेळी सीएसके संघाचा ऋतुराज गायकवाड यावेळी अगदी उत्तम खेळला. ही मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायलीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन फोटो पोस्ट केला.
-
या फोटोवरुनच ऋतुराजबरोबर तिच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सायली तिच्या व ऋतुराजच्या नात्याबाबत विचारण्यात आलं.
-
यावेळी ती म्हणाली, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. पण या सगळ्या ट्रोलिंगमुळे आता आमच्या दोघांमध्ये मैत्रीही राहिलेली नाही असं मला वाटतं. ट्रोलिंगचा आम्हाला त्रासच झाला आहे”.
-
“काही दिवसांपूर्वीच मी पिवळा ड्रेस परिधान करुन एक फोटो पोस्ट केला. माझ्या चित्रपटाचं प्रमोशन म्हणून मी हा फोटो पोस्ट केला”.
-
“तो फोटो पोस्ट केल्यानंतर ज्या कमेंट होत्या त्या वाचूनच मला भीती वाटायला लागली. मला असं वाटायला लागलं की, पिवळे कपडे परिधान करणंच मी बंद केलं पाहिजे”.
-
“मी याआधीही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करत होते. पण आपीएल आली की ही सगळी चर्चा सुरू होते. त्याचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होईल किंवा माझं दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न होईल तेव्हाच या चर्चा बंद होतील”. (सर्व फोटो – फेसबुक, इन्स्टाग्राम)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश