-
अभिनेता नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. (सर्व फोटो – फेसबुक, इंस्टाग्राम)
-
आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश तोसर आणि परश्याच्या मित्रांची भूमिका साकारणारा अरबाज शेठ आणि तान्हाजी गलगुंडे हे सर्वजण या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आले. (सर्व फोटो – फेसबुक, इंस्टाग्राम)
-
या चित्रपटात ‘लंगड्या’ची भूमिका करणाऱ्या तानाजीचे आयुष्यच बदलून गेले. (सर्व फोटो – फेसबुक, इंस्टाग्राम)
-
‘सैराट’ नंतर तानाजीला खूप प्रसिद्धी मिळाली. काही चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजनही केले. (सर्व फोटो – फेसबुक, इंस्टाग्राम)
-
तानाजींने ‘घर बंदुक बिर्याणी’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे आयुष्य कसे बदलले हे सांगितले. (सर्व फोटो – फेसबुक, इंस्टाग्राम)
-
तानाजीला सामान्य माणसांसारखे चालताही येत नव्हते. आता त्याने स्वतःवर लाखो रुपये खर्च केले आहेत. (सर्व फोटो – फेसबुक, इंस्टाग्राम)
-
तानाजी म्हणाला, ‘चित्रपटात काम करण्यापूर्वी मी शेती करायचो. मी शेती करत असताना कॉलेजमध्ये शिकत होतो. पण माझ्या कामाला मर्यादा होत्या. जर मी हे करत राहिलो असतो, तर मी अजूनही गावात असतो.
-
माझा बोलकापणा वाढला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला चांगली माणसं भेटली. चांगली टीम मिळाली.”
-
“चार पुस्तके वाचली. आता हळूहळू प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे.
-
“माझं आयुष्य खूप बदललं आहे. माझ्या पायावर शस्त्रक्रिया झाली. जर मी शेतीच करत बसलो असतो तर माझे पाय कधीच बरे झाले नसते.”
-
“मी आतापर्यंत माझ्या पायावर आठ ते दहा लाख रुपये खर्च केले आहेत. हे सर्व ‘सैराट’ चित्रपटामुळे शक्य झालं आहे.
-
माझे दोन्ही पाय आता जवळजवळ सरळ झाले आहेत. याचा अर्थ मी आर्थिकदृष्ट्याही सक्षम झालो आहे.

आता नुसता पैसाच पैसा; गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पाडणार