-
दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे होय.
-
तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
लवकरच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकणार आहे.
-
आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या पूजाच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात.
-
पूजा हेगडेने मुंबईतील माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. ती शालेय जीवनात हुशार होती.
-
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पूजा हेगडेने मुंबईतील एमएम कॉलेज ऑफ कॉमर्स ऑफ इकॉनॉमिक्समधून कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
-
नंतर तिने याच कॉलेजमधून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
-
कॉलेजमध्ये असल्यापासूनच पूजा फॅशन शोमध्ये भाग घ्यायची.
-
अभिनय क्षेत्रात काम करायचं तिने तेव्हाच ठरवलं होतं, त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्यावर ती चित्रपटांमध्ये आली.
-
तिने आतापर्यंत अनेक हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
तिचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.
-
(सर्व फोटो – पूजा हेगडेच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख