-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.
-
विनोदाची उत्तम जाण असणारी वनिता प्रेक्षकांना खळखळवून हसवते. मराठीबरोबरच वनिताने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे.
-
‘कबीर सिंग’ चित्रपटात वनिता झळकली होती. या चित्रपटात तिने शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने बॉलिवूड इंडस्ट्री व शाहीद कपूरबद्दल भाष्य केलं.
-
शाहीदबरोबर काम करण्याचा अनुभव वनिताने शेअर केला.
-
वनिता म्हणाली, “सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. पण, आपलं काम चांगलं असलं की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात.”
-
“बॉलिवूडमधील लोक कलाकारांचा आदर करतात. त्यांनी कधी आपल्याला बघितलेलंच नसतं. त्यामुळे ते एकदम नॉर्मल वागतात,” असंही ती म्हणाली.
-
“पण काम बघितल्यावर ते खूप कौतुक करतात. हे मला ‘कबीर सिंग’च्या बाबतीत जाणवलं,” असंही वनिताने सांगितलं.
-
वनिताने ‘कबीर सिंग’मध्ये काम केल्यानंतर शाहीद कपूरची प्रतिक्रिया काय होती, याबाबतही भाष्य केलं.
-
“मी शाहीदबरोबर पहिला सीन केल्यानंतर माझ्याबद्दलची त्याची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती. सुरुवातीला तो येऊन भेटला, बोलला,” असं वनिताने सांगितलं.
-
ती म्हणाली, “सीन शूट झाल्यानंतर तो एकदमच भारावून गेला होता. तू खूप चांगलं काम करते. तुझ्याबरोबर काम करताना मला मज्जा आली.”
-
“चित्रपटानंतर मी शाहीद कपूरबरोबर एका अवॉर्ड शोमध्येही काम केलं. त्यावेळीही तो तेवढ्याच आपुलकीने येऊन मला भेटला. बॉलिवूडमध्ये मला खूप चांगली वागणूक मिळाली,” असंही वनिताने सांगितलं.
-
‘कबीर सिंग’ चित्रपटातील वनिता मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं.
-
(सर्व फोटो : वनिता खरात/ इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई