-
मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी-धुमाळला ओळखले जाते.
-
हेमांगीला तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायमच ओळखले जाते.
-
काही वर्षांपूर्वी हेमांगीने ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली होती.
-
या पोस्टनंतर हेमांगीने घडलेल्या एका प्रसंगाबद्दल भाष्य केले.
-
नुकतंच हेमांगीने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये या पोस्टनंतरचा एक किस्सा सांगितला.
-
“बाई, बूब्स आणि ब्रा याबद्दल पोस्ट केल्यानंतर मी चार दिवस ट्रेंडला होते.”
-
“मला त्याचं अजिबातच कौतुक नाही. एक दिवस ट्रेंडींगला असतो, दुसऱ्या दिवशी नाही. हे सतत होत असतं.”
-
“या पोस्टनंतर माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. अनेक मैत्रिणींनी त्यांना होणारे त्रास माझ्याबरोबर सहन केले.”
-
“मला एका मुलाने रडतच एक व्हॉईज नोट पाठवली होती.”
-
“त्यात त्याने म्हटलेलं की, मी इतकी वर्ष माझ्या बायकोवर जाच करत होतो.”
-
“कारण मी नेहमी तिची तुलना तुमच्यासारख्या अभिनेत्रींबरोबर करायचो. यांचं किती छान दिसतं, तुझं का असं आहे, असे मी तिला कायम म्हणायचो.”
-
“तेव्हा ती मला म्हणायची की त्या हिरोईन आहेत वैगरे…! “
-
“पण तुझा सर्व लेख वाचल्यानंतर कळलं की बापरे बायका इतक्या बंधनात असतात.”
-
“बाहेरची बंधन तर असतातच. पण स्वत:च्या घरातही ही बंधन असतात.”
-
“आई आली, बाबा आले, सासरे आले, दीर आला की म्हणून पटकन ओढणी वैगरे घ्यायची, का कशासाठी..?”
-
“मी तेव्हापासून माझी आई, बायको आणि बहिणी या तिघींना सांगतो, तुम्हाला जसं राहायचं तस राहा.”
-
“आम्ही आमची नजर बदलली पाहिजे.”
-
“यामुळे एका माणसात बदल झाला ना, त्याचे डोळे उघडले ना, बस्स मला अजून काहीही नको.” असे हेमांगी कवीने म्हटले.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख