-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या नवीन वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते.
-
या वेब सीरीजचा प्रचार करण्यात ती व्यस्त आहे.
-
दरम्यान, प्रियांकाबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.
-
प्रियांकाने मुंबईतील तिची एक प्रॉपर्टी विकली आहे
-
ज्यासाठी तिला करोडो रुपये मिळाले आहेत.
-
तिने मुंबईतील लोखंडवाला येथे असलेली तिची एक व्यावसायिक मालमत्ता विकली आहे.
-
ही मालमत्ता वास्तु प्रीसिंक्ट, लोखंडवाला रोडच्या दुसऱ्या मजल्यावर आहे
-
१७८१.१९ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ आणि ४६५ चौरस फूट टेरेस क्षेत्राची ही कार्यालयीन जागा आहे.
-
प्रियांकाच्यावतीने तिची आई मधु चोप्रा यांनी हा करार निश्चित केला आहे.
-
ही मालमत्ता दंतचिकित्सक डॉ. नितेश आणि डॉ. निकिता मोटवानी या दाम्पत्याने खरेदी केली आहे. ,
-
तसेच याठिकाणी कार पार्किंगसाठी खुली जागा आहे.
-
. ही मालमत्ता विकून प्रियांका चोप्राला ७ कोटी रुपये मिळाले.
-
२०२१ मध्ये एका दंतचिकित्सक जोडप्याने ही भाड्याने घेतली होती.
-
प्रियांका चोप्राची भारतात आणि परदेशात करोडोंची संपत्ती आहे.
-
सध्या ती पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे.
-
प्रियांका चोप्राच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचे तर, ‘सिटाडेल’सोबतच ती ‘लव्ह अगेन’ या चित्रपटातही दिसणार आहे.
-
तसेच ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
फरहान अख्तर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”