-
सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्री आरती मित्तलला सोमवारी(१७ एप्रिल) पोलिसांनी अटक केली.
-
मुंबई क्राइम ब्रांच युनिट ११ने ही कारवाई केली आहे. पोलीस अधिकारी मनोज सुतार यांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती.
-
पोलिसांनी बनावट ग्राहकांना हॉटेलवर पाठवत हे प्रकरण उघडकीस आणलं. त्यांनी आरती मित्तलकडे दोन मुलींची मागणी केली. यासाठी ६० हजार रुपये आरतीने मागितले होते.
-
आरती मित्तल सेक्स रॅकेट प्रकरणात दोन मॉडेल्सची गोरेगाव येथून सुटका करण्यात आली आहे. या मॉडेल्सला आरती मित्तल १५ हजार रुपये देणार होती, असा खुलासा त्यांनी केला आहे.
-
आरती मित्तल अभिनेत्री व कास्टिंग दिग्दर्शक आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
नुकतंच ती ‘अपनापन: बदलते रिश्तों का बंधन’ मालिकेत झळकली होती. ‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेतही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
‘ये है चाहते’, ‘धर्मपत्नी’, ‘सनक: एक जुनून’ या मालिकांमध्येही ती झळकली होती.
-
आरती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लक्षात येतं.
-
इन्स्टाग्रामवर तिचे दहा हजारांहून अधिक फॉलोवर्स असून तिने अनेक सेलिब्रिटींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
-
दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांच्या ‘कर्म युद्ध’ चित्रपटातही तिने काम केलं आहे.
-
(सर्व फोटो : आरती मित्तल/ इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख