-
महाराष्ट्रातील अनेकांची क्रश असणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहिले जाते.
-
प्राजक्ताने अल्पावधीत कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
तिने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
प्राजक्ता माळीने नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत तिला फॅनचा आलेला एखादा विचित्र अनुभव विचारण्यात आला.
-
त्यावर तिने या अनुभवाबद्दल सांगितले.
-
“मला एकदा एका चाहत्याने मुंग्यांची पावडर दिली होती.”
-
‘तू गोड आहे, म्हणून त्याने हे दिलं होतं का?’ असं तिला विचारले असता ती ‘हो’ म्हणाली.
-
“त्यावेळी मला हे काय गिफ्ट आहे, असा प्रश्न पडला होता.”
-
“विशेष म्हणजे त्यावेळी त्याने मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय वैगरे मला म्हटलं होतं.”
-
“त्याने ते गिफ्ट छान पॅकही केलं होतं.”
-
“मी ते उघडल्यानंतर मला त्यात मुंग्यांची पावडर सापडली होती.”
-
“यावर मी ओके, धन्यवाद असे म्हटलं होतं.”
-
प्राजक्ता ही सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
प्राजक्ताने मालिकांबरोबरच मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख